आता RuPay क्रेडिट कार्डवर बिनधास्त करता येणार पेमेंट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ ऑक्टोबर । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. रुपे क्रेडिट कार्डवरून यूपीआयद्वारे २००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. रुपे क्रेडिट कार्ड गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असून सर्व प्रमुख बँका त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. परिपत्रकात म्हटले आहे की, या श्रेणीसाठी शून्य व्यापारी सवलत दर (MDR) २००० रुपयांपेक्षा कमी आणि समान व्यवहारांवर लागू होईल. एमडीआर म्हणजे क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ग्राहकाकडून पेमेंट प्राप्त करण्यासाठी व्यापाऱ्याला बँकेला भरावे लागणारे शुल्क. हे शुल्क व्यवहाराच्या रकमेच्या प्रमाणात आकारले जाते.

आरबीआयने मंगळवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये क्रेडिट कार्ड सक्षम करण्यासाठी ग्राहकाची संमती आवश्यक आहे.” आरबीआयने सांगितले की, “हे परिपत्रक जारी केल्याच्या तारखेपासून हा नियम लागू होईल. सदस्यांनी याची नोंद घ्यावी आणि हे परिपत्रक संबंधित भागधारकांना कळवावे, ही विनंती.

रुपे कार्ड हे मास्टरकार्ड, व्हिसा आणि युरो इत्यादी इतर पेमेंट कार्डांसारखेच आहे. रुपे कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने लाँच केले. देशातील पेमेंट सिस्टम एकत्र करण्याच्या उद्देशाने हे सुरू करण्यात आले. देशातील प्रमुख बँका RuPay कार्ड जारी करतात. RuPay कार्ड सर्व भारतीय बँका, ATM, POS आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर काम करते. विशेष म्हणजे यामध्ये ट्रान्झॅक्शन चार्जेस खूप कमी आहेत. तसेच, हे भारतात बनवले जात असल्याने त्याची प्रक्रियाही जलद होते. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी याआधी सांगितले होते की, “क्रेडिट कार्ड्स यूपीआयशी लिंक करण्याचा मूळ उद्देश ग्राहकांना पेमेंट पर्यायांची विस्तृत निवड प्रदान करणे आहे. सध्या UPI डेबिट कार्डद्वारे बचत खात्यांशी किंवा चालू खात्यांशी जोडलेले आहे.

आरबीआयसीचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २१ सप्टेंबर रोजी यूपीआय नेटवर्कवर रुपे क्रेडिट कार्ड लाँच केले. याआधी फक्त बँक खाती आणि डेबिट कार्डच यूपीआय नेटवर्कशी जोडले जाऊ शकत होते. तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जोडून देखील गुगल पे वरुन पैसे देऊ शकता. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये यूपीआयच्या माध्यमातून देशात एकूण ११.१६ लाख रुपयांचे व्यवहार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *