महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । बीकेसी मधील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन करत आपली भूमिका स्पष्ट केली.
एकनाथराव माझ्या आवडीचे नेते आहेत. अशा धडाडीचा माणसासाठी मी इथे आलो आहे. चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि आताचा मुख्यमंत्री असे दोघांचा इतिहास आपल्याकडे आहे. यांना एकटं सोडू नका. हा नेता खूप जिद्दीचा आहे. आता सगळं बरखास्त करा आणि राज्यात शिंदे राज्य आणा, असे आवाहन जयदेव ठाकरे यांनी या वेळी केले.