महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ ऑक्टोबर । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होत आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत रविवारी रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय मध्ये भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतासाठी अष्टपैलू शाहबाज अहमद याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत एक गडी बाद केला. शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे, पण भारतीय संघासाठी त्याला आज पहिल्यांदाज खेळण्याची संधी मिळाली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्वतःचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अहमदने यापूर्वी बंगाल संघासाठी देशांतरगत क्रिकेटमध्ये १९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ११०३ धावा केल्या आणि यादरम्यान ६२ बळी देखील घेतले आहेत.