महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ ऑक्टोबर । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होत आहेत. मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत जागतिक बाजारात 95.60 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली आहे. तर WTI प्रति बॅरल $90.62 वर पोहोचली आहे. या किमती गेल्या महिन्यापेक्षा जास्त आहेत. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल कंपन्यांनी आज इंधनाचे नवे दर जाहीर केले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झाला नाही.
हरियाणामध्ये पेट्रोल 0.23 रुपयांनी वाढून 97.52 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.22 रुपयांनी वाढून 90.36 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं. हिमाचलमध्ये 0.68 रुपयांनी पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ झाली. तर डिझेल प्रति लिटरमागे 0.58 रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 50 पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय पंजाब आणि राजस्थानमध्ये किमतीत किंचित वाढ झाली आहे.
चार प्रमुख महानगरांमध्ये कोणताही बदल झाला नाही. या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर