महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ ऑक्टोबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाकडून आज मोठा दिलासा मिळाला. ईडीने अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या कथीत मनी लाँड्रिगच्या प्रकरणात अटक केली असून ते मागील 11 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अलिकडेच देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. या आदेशास ईडीने सर्वोच्च न्यायालत आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे अनिल देशमुख यांचा ईडीच्या प्रकरणातील जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीबीआयकडे सुरू असणाऱ्या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी अन्य आरोपी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या कोठडीत मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी केली वाढ केली आहे.