महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध विनोदी कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीला कर्करोगाचं निदान झालं आहे. दया गडा या व्यक्तिरेखेसाठी आवाजात बदल केल्याने तिला त्रास झाल्याची माहिती मिळत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेत 2008पासून दया गडा नावाचं पात्र अभिनेत्री दिशा वकानीने साकारलं. मालिकेच्या प्रचंड लोकप्रियतेत दिशा हिने साकारलेल्या दयाबेन या व्यक्तिरेखेचाही तितकाच वाटा आहे. जवळपास नऊ वर्षं दिशा वकानीने ही व्यक्तिरेखा साकारली. त्यानंतर 2017पासून दिशाने गरोदरपणासाठी आणि नंतर मुलाच्या संगोपनासाठी सुट्टी घेतली. ती अद्याप पुन्हा पडद्यावर झळकलेली नाही.
तिच्या मालिकेत परण्यावरून वारंवार चर्चा होत असतात. त्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांची उत्सुकताही ताणली जाते. आताही ती मालिकेत परतणार की नाही, यावरून चर्चा रंगत असताना तिला कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. तिला घशाचा कर्करोग झाला असून तिने दयाबेनसाठी बदललेल्या आवाजामुळे हा परिणाम झाला असल्याची माहिती मिळत आहे.