पुण्यात सलग दुसर्‍या दिवशी पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आणि अरबी समुद्रात चक्राकार वारे तयार झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात अवकाळी पाउस पडत आहे. एकीकडे कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शहराच्या अनेक भागात दुपारनंतर पाउस हजेरी लावत आहे. दोन दिवस झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

दुपारी चार ते साडेचार च्या सुमारास उपनगरांसह शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमध्ये हा पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे शुक्रवारी आणि शनिवारी शहरातील विविध भागतील २०० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *