महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ ऑक्टोबर । ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या आदेशानंतर त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली असून त्या अर्ज दाखल करणार आहेत.
सामान्य कर्मचाऱ्याचा राजीनामा मंजूर करण्यास पालिका एवढे महत्त्व का देते, अशी विचारणाही कोर्टाने गुरुवारी केली यामुळे आज सकाळीच त्याच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आला.
उद्धव ठाकरे शिवसेनेकडून ऋतुजा लटके या उमेदवार आहेत. भाजप आणि शिंदे सेनेकडून कोण उमेदवार असेल, याबाबत रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खलबते सुरू होती. रात्री उशिरा मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. पटेल कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याने लटके-पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे.
पालिकेचे वकील अॅड. अनिल साखरे म्हणाले, लटकेंविरुद्ध एकाने 12 ऑक्टोबरला भ्रष्टाचाराची तक्रार दिली आहे. याचा तपास करायचाय. नियमानुसार राजीनाम्यासाठी 30 दिवसांपूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे. राजीनामा दिल्यानंतर लटके कार्यालयात आल्याच नाहीत. लटकेंच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढत त्यांनी 3 रोजी राजीनामा दिला असताना आत्ताच तक्रार कशी आली, असा प्रश्न केला.