ऋतुजा लटकेंकडे 50 लाख रुपयांची मालमत्ता अन् 18 लाखांचे कर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । दिवगंत रमेश लटके यांनी 2019 मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून अर्ज भरला तेव्हा त्यांनी स्वतःकडे 1.27 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती दिली होती. यासोबतच पत्नी ऋतुजा लटके यांच्याकडे सुमारे 22 लाख रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती दिली होती. या मालमत्तेत आतापर्यंत वाढ झाली की घट हे अजून समोर आले नाही.

लटके यांनी निवडणूक आयोगाला स्वत:कडे असलेल्या 2.70 कोटी रुपयांच्या आणि पत्नी ऋतुजा यांच्याकडे 50 लाख रुपयांच्या स्थावर संपत्तीची माहिती दिली होती. तसेच 2019 मध्ये स्वतःवर 1.16 कोटी रुपये आणि पत्नीवर 18.81 लाखांचे कर्ज असल्याची माहिती माहिती दिली होती.

मुरजी पटले यांनी 2019 मध्ये ​​भाजपविरोधात बंडखोरी केली आणि अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी शपथपत्रात स्वतःकडे 65.63 लाख आणि पत्नी केसरबेन यांच्याकडे 46.64 लाख रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती दिली होती. तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भावना पटेल यांच्याकडे 5.05 लाख, मनीषा पटेल यांच्याकडे 1.50 लाख आणि पार्थ पटेल यांच्याकडे 60 हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती देण्यात आली. पटेल यांनी 2019 मध्ये खुलासा केला होता की त्यांच्याकडे स्वतःकडे 1.95 कोटी रुपये आणि पत्नीकडे 1.85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *