Governor 12 MLA Appointment ; राज्यातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत मोठी बातमी समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ ऑक्टोबर । महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा बराच गाजला होता. हे प्रकरण अजूनही गाजत असून आता सुप्रीम कोर्टाने राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) नियुक्त आमदारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on Governor) राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरील स्थगिती कायम ठेवली आहे. याबाबत राज्य सरकारला बाजू मांडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तर याबाबतची पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात केली जात होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 12 आमदारांच्या यादीचा मुद्दा राज्यपालांनी मुद्दामून प्रलंबित ठेवला, अशी टीकाही करण्यात आली होती.

दरम्यान, शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर 12 आमदारांच्या नियुक्तीवर तातडीने निर्णय घेण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आलेला होता. यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरील स्थगिती कायम ठेवण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *