लायटिंग बाजारावर भारताचा दबदबा वाढला ; चीनवर मात, 40% लायटिंग देशी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ ऑक्टोबर । दिवाळी ज‌वळ येताच रोषणाईच्या या सणासाठी लायटिंगचा बाजार सज्ज झाला आहे. १,००० कोटींच्या या बाजारावर अनेक वर्षांपासून चिनी वस्तूंचा १००% कब्जा होता. तथापि, गलवान संघर्षानंतर चीनबद्दल निर्माण झालेला संताप अद्यापपर्यंत कायम आहे. ग्राहकांची मेड इन इंडिया झालरला पसंती आहे. त्यामुळेच बाजारात ३०-४०% झालर विकल्या जात आहेत. चिनी झालरला वॉरंटी नसते, तर भारतीय झालरवर ३-४ हंगामांची वॉरंटी दिली जात आहे.

या वर्षी डिझायनर (जॉय) लायटिंगला जास्त मागणी आहे. ओरिएंट इलेक्ट्रिकचे ईव्हीपी अतुल जैन यांनी सांगितले की, दिवाळीला जॉय लायटिंगचा व्यवसाय ८० ते १०० कोटींचा असतो. यंदा देशी कंपन्यांनी दिवे, गणपती, स्वस्तिक या डिझाइनच्या चांगल्या प्रतीच्या झालर आणल्या आहेत. ४० ते ५० हजार वितरकांमार्फत या झालर उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

ट्रेंड बदलतोय : प्रत्येक खोली, वापरानुसार वेगळी लायटिंग आता खोली आणि वापराच्या हिशेबाने वेगवेगळे लाइट खरेदी केले जात आहेत. रंग बदलणाऱ्या आणि डिम होणाऱ्या लाइटव्यतिरिक्त रिमोट कंट्रोल्ड, मोबाइल आणि लॅपटॉपने नियंत्रित होणाऱ्या लायटिंगला मागणी आहे. अशा प्रकारचे लाइट देशातच असेंबल होत आहेत. गेल्या ५ वर्षांत वीज बचत करणारी लायटिंग आल्याने विजेचा खपही खूप कमी झाला आहे.

एलईडी लायटिंग उद्योग २३,००० कोटी रुपयांचा इलेक्ट्रिक लॅम्प अँड कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननुसार, देशात एलईडी लायटिंगचा व्यवसाय २३,००० कोटी रुपयांचा आहे. त्यात कन्झ्युमर लायटिंगचा वाटा ६०% आहे.

लायटिंगमध्ये चीन आणि इतर देशांवर अवलंबित्व भारतात एकूण लायटिंगमध्ये एलईडीचा वाटा ९२% पर्यंत आहे. तथापि, निर्मिती खूप कमी आहे. अजूनही एलईडीच्या ६५% सुट्या भागांसाठी आपण चीन तसेच इतर देशांवर अवलंबून आहोत.

देशात वाढतोय एलईडी लायटिंगचा व्यवसाय वर्षवृद्धी दर 2019-20-3.7% 2020-21 7.7% 2021-22 9.7% 2022-23 10.2% 2023-24 10.3% (2022-24 चे अंदाजित आकडे)

८५% असेंब्लिंग देशात ^पीएलआय योजनेनंतर लायटिंग निर्मात्यांत उत्साह आहे. फिनिश्ड प्रॉडक्टमध्ये चीनवरील अवलंबित्व संपत आले आहे. ८५% असेंब्लिंग भारतातच होत आहे.- अतुल जैन, ओरिएंट इलेक्ट्रिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *