मुंबईत एकूण 1804 कोरोना रुग्ण पूर्ण पणे बरे; 441 नवे रुग्ण, तर 21 जणांचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – 1804 नागरिकांची कोरोनावर मात.. मुंबईत एकूण 1804 कोरोना रुग्ण पूर्ण पणे बरे झाले आहेत. त्या रविवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या 100 कोरोना रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत सेवेन हिल्स आणि कस्तूरबा गांधी रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.मुंबईत कोरोना विषाणूनं अक्षरश: कहर केला आहे.मुंबईत रविवारी कोरोनाचे 441 नवे पॉजिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुंबईत एकूण रुग्णसंख्या 8613 झाली आहे. तर कोरोनामुळे 21 मृत्यू झाला आहे. आतापर्यत कोरोनामुळे मृतांचा आकडा एकूण 343 झाला आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत रविवारी कोरोनाचे 94 नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. धारावीत कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत कोरोनाबाधितांची एकूण 590 वर पोहोचली असून आतापर्यंत 20 जणाचा मृत्यू झाला आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. धारावीत कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या 600च्या जवळ पोहोचली आहे. रविवारी 94 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. धारावीत दाटीवाटीने तब्बल 8 ते 9 लाख लोक राहतात. येथील घरांचा आकार लहान असल्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अवघड जात असल्याचं तज्ज्ञांच मत आहे. सरकारकडून अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण येऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *