महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वॉशिंग्टन – विशेष प्रतिनिधी – : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी, 2020च्या शेवटापर्यंत कोरोना व्हायरसवर लस तयार करु शकत असल्याचा दावा केला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव अमेरिकेत पाहायला मिळतोय. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकाकडे कोरोनावरील लस असेल असा दावा केला आहे.
कोरोनावर अनेक देशांकडून लस तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. AFP न्यूजकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनावरील लस तयार करण्याच्या आम्ही अतिशय जवळ असून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, 2020 हे वर्ष संपता-संपता आम्ही कोरोनावरील लस तयार करु असं, डोनाल्ड ट्रन्प यांनी सांगितंलय. लस तयार करण्यात, इतर कोणत्याही दुसऱ्या देशाने अमेरिकी संशोधक आणि रिसर्चला मागे टाकल्यास मला त्याची चिंता नसून, कोरोनावर केवळ प्रभावी लस सापडणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
US President Donald Trump (in file pic) says US to have coronavirus vaccine by 'end of this year': AFP news agency pic.twitter.com/xxqB0NNt55
— ANI (@ANI) May 3, 2020