महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – : ओमप्रकाश भांगे ; पुणे शहरातील कंटेनमेंट झोनची हद्द कमी केल्याने 97 टक्के भागातील दुकाने आजपासून सुरू होऊ शकतील. . पुणे शहरातील कोरोनाबाधित क्षेत्राची अर्थात कंटेनमेंट झोनची हद्द कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आतापर्यंत पुणे शहरातील 330 चौरस किलोमीटरचे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्याने सील करण्यात आले होते. मात्र आजपासून यातील 10 चौरस किलोमीटरचे क्षेत्रच कंटेनमेंट झोन म्हणून राहील. त्यामुळे पुणे शहराच्या एकुण क्षेत्रफळाच्या 97 टक्के क्षेत्र कंटेनमेंट झोनमध्ये नसेल.त्यासाठी महापालिकेने ज्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झालाय, त्या वस्त्याच सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील 97 टक्के भागात राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दुकानं उघडली जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योग कंपन्या बंदच राहणार
पिंपरी-चिंचवड शहर रेड झोनमध्ये असल्याने येथील लघुउद्योग कंपन्या बंदच राहतील. तर चाकण एमआयडीसीमधील कंपन्या मात्र सुरू होणार आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, कुदळवाडी सह अन्य भागात एकूण 11 हजार कंपन्या आहेत. त्यापैकी 150 ते 200 अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या वगळता सर्वांना काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
दुसरीकडे चाकण एमआयडीसी परिसरातील 650 कंपन्या उद्यापासून कामास सुरुवात करत आहेत. रेड झोनमधील कामगार वगळता ग्रीन झोनमधील 30 टक्के कर्मचारी कंपनीत काम करू शकतील, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.