महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ ऑक्टोबर । शिंदे-फडणवीस सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांमधील लोकप्रतिनिधींना वागण्याचं तारतम्य राहिलेलं नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे.
तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परखड सवाल उपस्थित केले आहेत.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारला १०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. नव्याचे ९ दिवस असतात हे मान्य. पण लोकप्रतनिधींना कशा पद्धतीने वागायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही. यांचे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना म्हणतात ‘तुमच्या बापाची पेंड आहे का? किती वाजता आला? तुमची वाट बघायला आम्ही काय तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतर तुम्हाला समजेल’. महाराष्ट्रात ही भाषा? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?” अशा शब्दांत अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला आहे.