महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ ऑक्टोबर । शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना मंगळवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी एअर अँब्युलन्सने मुंबईला नेण्यात आले. मुंबईत लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचारपुस करण्यासाठी रुग्णलयात दाखल झाले आहेत. (Maharashtra Political Mla Sanjay Shirsat Heart Attack Angioplasty Cm Eknath Shinde)
आमदार शिरसाट यांच्यावर अँजोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. शिरसाट यांची प्रकृती उत्तम असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज रुग्णलयात दाखल होत शिरसाट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी फोन करुन शिरसाटांच्या परिवाराला धीर दिला होता.
आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे औरंगाबादेतील सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शिरसाट दवाखान्यात दाखल झाल्याचे कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी वारंवार संपर्क साधून शिरसाट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.