Diwali 2022 : दिवाळी हा अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा सण ; लक्ष्मीची मुर्ती खरेदी करताना या गोष्टी अजिबात विसरु नका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० ऑक्टोबर । दिवाळी हा अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा सण आहे. या दिपोत्सवात संपूर्ण देशा उन निघतो दिवाळी पर्वात लक्ष्मी पुजनाला विशेष महत्व आहे. दिवाळीनिमीत्त घरात पुजन केल्याने सुख समृध्दी नांदते. व्यापारी वर्गही मोठ्या भक्ती भावाने लक्ष्मीचे पुजन करतात. हे पूजन करताना अनेकजण लक्ष्मीची मुर्ती किंवा फोटो बाजारातून खरेदी करतात.

जर तुम्हीही लक्ष्मीची नवीन मूर्ती किंवा फोटो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढील गोष्टी नेहेमी लक्षात ठेवा. देवीची मुर्ती किंवा फोटो खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते, असे न केल्यास घरात संकटे, वादविवाद उद्भवतात. (Important care while buying Lakshmi Devi idol in Diwali Festival 2022 spiritual Significance)

 

चला तर पाहूया लक्ष्मीची मुर्ती तथा फोटो खरेदी करताना तसेच घरात पुजनावेळी स्थापित करताना कोणती काळजी घ्यावी.

* लक्ष्मीची मुर्ती किंवा फोटो खरेदी करताना नेहमी देवी ही सिंहासनावर विराजमान झालेली असावी.

* लक्ष्मीची खंडित मूर्ती खरेदी करू नये. या मुर्त्यांना शुभ मानले जात नाही. अशा मुर्त्या घरात असतील तर लवकरात लवकर विसर्जित कराव्या.

* देवीचा फोटो खरेदी करताना त्यात कुठेही तडा गेलेला नसावा.

* घरात पुजेसाठी लक्ष्मीची मुर्ती खरेदी करताना ती 10 ते 12 इंच यापेक्षा अधिक उंचीची नसावी.

* एकाच वेळी देवघरात लक्ष्मीच्या दोन मुर्त्या स्थापन करु नये. असे केल्यास घरात वाद निर्माण होतात.

* लक्ष्मीची पूजा करताना गणपती बाप्पा आणि सरस्वती देवीची सोबत पूजा केली जाते. त्यामुळे केवळ लक्ष्मीची मूर्ती ठेऊ नये,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *