India Vs Pakistan T20 Live : फक्त शाहीन आफ्रिदी नाही तर या तीन पाकिस्तानी खेळाडू पासुन टीम इंडिया नि सावध रहावे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ ऑक्टोबर । आयसीसी टी २० वर्ल़्ड कपमध्ये पाकिस्तानकडून न हरण्याचा रेकॉर्ड गेल्या वेळीच तुटला होता. आजच्या भारत – पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट आहे. मात्र, जाणकारांनुसार पूर्ण मॅच रद्द होण्याची शक्यता कमी आहे. असे असताना दोन पारंपरिक संघ भिडणार असल्याने दोन्ही देशांचे लाखो क्रिकेटप्रेमी मॅच पाहण्यासाठी पोहोचले आहेत. सर्व तिकिटे विकली गेली आहेत. भारतीय संघातील महत्वाचे खेळाडू जायबंदी झाल्याने भारतीय चाहत्यांची काहीशी निराशा झालेली आहे.

रोहित शर्मा आणि बाबर आझमसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. पूर्ण वर्ल्डकप गेला तरी चालेल पण हीच एक मॅच आहे, अशा अविर्भावात चाहते आहेत. अशावेळी जखमी झालेल्या भारतीय संघासाठी पाकिस्तानचे पाच प्लेअर खूप खतरनाक ठरू शकतात. त्यात पाकस्तानचा किलर गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आहेच.

बाबर आझम (Babar Azam)
पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम पुन्हा फॉर्मात आला आहे. भारताविरोधात भलेही तो फ्लॉप होत असेल, तरी त्याची क्षमता बेजोड आहे. बाबर आझमने 2017 ते 2022 पर्यंत खेळलेल्या 8 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (कसोटी + एकदिवसीय) 35.71 च्या सरासरीने केवळ 250 धावा केल्या आहेत. ५०.५३ ची सरासरी असलेला फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकतो.

मोहम्मद रिझवान
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टी-20 फॉरमॅटच्या नंबर वन बॅट्समनला थोडेतरी दबकून रहावे लागेल. रिझवान हा एका बाजुने विकेट वाचवून उभा ठाकतो, तेव्हा खरी समोरच्या गोलंदाजांची पंचाईत होते. 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या विश्वचषकात रिजवानने बाबरसोबत 150 हून अधिक धावांची भागीदारी करून भारताला 10 विकेट्सने हरविले होते. रिझवान दबाव हाताळण्यातही पटाईत आहे. यामुळे त्याला लवकर आऊट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

नसीम शाह (Naseem Shah)
आशिया चषक २०२२ मध्ये नसीम शाहचे वर्चस्व होते. झंझावाती गोलंदाजीसोबतच त्याने बॅटनेही झोडपले होते. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. उसळी खेळपट्ट्यांमुळे नसीम हा भारतीयांसाठी भेदक ठरू शकतो.

शाहीन शाह आफ्रिदी
जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक अशी सध्या शाहीन शाह आफ्रिदीची ख्याती आहे. डावखुरे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांना नेहमीच त्रास देतात. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहलीही शाहीन आफ्रिदीला सामोरे जाण्याची तयारी करणार आहेत. 2021 च्या विश्वचषकात त्याने तिन्ही फलंदाजांना बाद केले. तो आणि नसीम हे भारतीय संघाचे कंबरडे मोडण्यासाठी सक्षम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *