बजरंगबली ची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ ऑक्टोबर । हिंदू धर्मात मारुतीनंदन वीर हनुमान हे श्री रामाचे परम भक्त मानले जातात. भूत-आत्मा आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हनुमानाचे स्मरण केले जाते. हनुमानाला संकटनिवारक असेही म्हणतात, कारण ते भक्तांचे सर्व संकटे दूर करतात. शास्त्रात हनुमानाच्या विविध मूर्तींची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

आज आम्ही तुम्हाला पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीचे उपाय सांगणार आहोत. पंचमुखी हनुमानाची पाच मुखे म्हणजे गरुड मुख, वराह मुख, नरसिंग मुख, हयग्रीव मुख आणि हनुमान मुख. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, पंचमुखी हनुमानाची मूर्ती घरी ठेवल्याने जीवनात अपार यश मिळते. हनुमानाच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात. जाणून घेऊया पंचमुखी हनुमानाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे शुभ असते.

या दिशेला ठेवा मूर्ती –

ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये पंचमुखी हनुमानाचे चित्र लावण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा उत्तम मानली जाते. हनुमानाचे चित्र दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावल्याने त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो. हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. यासोबतच आर्थिक संकटातूनही सुटका मिळते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्याने व्यक्तीचे मनोबलही वाढते.

नकारात्मक शक्तींपासून संरक्षण –

हनुमान चालिसेत म्हटले आहे, भूत प्रेत निकट नहीं आवे…. पंचमुखी हनुमानाचे चित्र लावल्याने घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो. ज्यामुळे जीवनात आनंद टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. असे मानले जाते की, हनुमानाचे चित्र लावल्याने मंगळ, शनि, पितृ आणि भूतादी दोष दूर होतात. मंगल दोष निवारणासाठी हनुमानाचे चित्र दक्षिण दिशेला लावावे. परंतु, हनुमानाची मूर्ती लाल रंगाची असावी हे लक्षात ठेवा.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *