Babar Azam : परत एकदा मॅच विनर ठरला खलनायक, पराभवानंतर बाबर म्हणतो, ‘निराश..’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ ऑक्टोबर । टी-20 विश्वचषकाच्या 24 व्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 1 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 130 धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 129 धावा करू शकला आणि सामना 1 धावाने गमावला. त्याचवेळी या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम खूपच निराश दिसला.

पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा बाबर आझमचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये तो ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसत होता. यादरम्यान त्याने मोहम्मद नवाजला आपला विजेता खेळाडू म्हणून सांगितले. गुरुवारी झिम्बाब्वेविरुद्ध त्याला आपली मागील सर्व पापे धुण्याची संधी होती, पण यावेळीही तो हिरो संघाचा खलनायक बनला.

दुसरीकडे झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर निराश झालेल्या बाबर आझमने सांगितले की, ‘आमच्या संघाची कामगिरी खूपच खराब झाली. फलंदाजीत आम्हाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आमच्याकडे चांगले फलंदाज होते पण दोन्ही सलामीवीर पॉवरप्लेमध्ये बाद झाले. जेव्हा शादाब आणि शान मसूद भागीदारी करत होते पण दुर्दैवाने शादाब बाद झाला आणि त्यानंतर पाठीमागे विकेट पडल्यामुळे आम्ही दडपणाखाली आलो.

गोलंदाजीबद्दल बोलताना बाबर म्हणाला की, पहिल्या 6 षटकांमध्ये आम्ही नवीन चेंडूचा चांगला वापर केला नाही. पण शेवटी आम्ही चेंडूने चांगली कामगिरी केली. आम्ही आमच्या चुकांवर बसून चर्चा करू. आम्ही कठोर प्रशिक्षण देऊ आणि पुढील सामन्यात जोरदार पुनरागमन करू.

पाकिस्तानने 88 धावांवर 5वी विकेट गमावली तेव्हा मोहम्मद नवाज फलंदाजीला आला. त्यावेळी संघाला 37 चेंडूत 43 धावांची गरज होती. नवाजने हळूहळू पाकिस्तानचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. नवाजने पहिल्या चेंडूवर तीन धावा घेत मोहम्मद वसीम ज्युनियरला स्ट्राइक दिली. मात्र, पुढच्याच चेंडूवर वसीमने चौकार मारला. यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर धाव घेत नवाजला स्ट्राइक परत दिली. चौथ्या चेंडूवर नवाजला एकही धाव करता आली नाही. आणि दोन चेंडूत 3 धावांची गरज असताना तो त्या चेंडूवर तो बाद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *