महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ ऑक्टोबर । आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या पुढाकाराने पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून, या शिबिरात रक्तदाब(BP), मधुमेह, डोळ्यांचे विकार, स्त्रीरोग, लहान मुलांचे आजार यांची तपासणी होणार असून, या शिबिरात तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असणार आहे, तरी कार्यकर्त्यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना याविषयी माहिती द्यावी व जास्तीत जास्त नागरिकांचा शिबिरात सहभाग वाढवावा.