कडु म्हणाले, मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. रा
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ ऑक्टोबर । आमदार बच्चु कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता शांत झाल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात बच्चु कडूंनी पत्रकार परिषदेत रवी राणा यांची माफी मागितली आहे. यामुळे राणा आणि कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले होते.
णा यांनी माफी मागितल्याचे मला कळले आहे. त्यामुळे देखील यापुढे वाद नको म्हणून माघार घेतो आहे. माझे शब्द मागे घेतो. यापुढे सामाजिक कामाला प्राधान्य देणार असल्याचे कडू यांनी सांगितले आहे.
दुसरीकडे रवी राणा यांनी बच्चू कडू यांची माफी मागत मी दिलेले शब्द मागे घेतो म्हणत हा वाद संपवला आहे. पुढं बोलताना ते म्हणाले की, मी माझे शब्द मागे घेतो, मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून कोणी दुखवल असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतो. आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटविण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु केले होते. रविवारी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी रवी राणा नागपूरहून मुंबईत दाखल झाले होते.