महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । टी-20 विश्वचषकात मध्ये रोहित शर्माची आज सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. भारत आणि बांगलादेश अॅडलेडवर आमने-सामने असणार आहेत. मात्र या सामन्यात पाऊस त्रास देऊ शकतो. अॅडलेडमध्ये मंगळवारी खुप पाऊस झाला होता आणि बुधवारीही ढगाळ वातावरण आहे. भारताची या स्पर्धेत चांगली सुरुवात झाली. भारताने आधी पाकिस्तान नंतर नेदरलँड्सविरुद्ध विजयाची नोंद केली, पण अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 5 विकेट्सने पराभव झाला. त्याचे 3 सामन्यांत 4 गुण आहेत.
भारताचा आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेशी असणार आहे. या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मेलबर्नमध्ये पावसामुळे सुपर-12 चे अनेक सामने रद्द करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर मोठा धोका असु शकतो.
सुपर-12 च्या ग्रुप-2 मध्ये भारताचा रन रेट सध्या 0.844 आहे. तर पाकिस्तानचा स्कोअर 0.765 आहे. पाकिस्तानचे 3 सामन्यांत 2 गुण झाले असून तो गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि भारताला 2 सामन्यांत 2 पेक्षा जास्त गुण मिळू नयेत अशी प्रार्थना करावी लागेल. त्याला 3 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी तर 6 नोव्हेंबरला बांगलादेशशी सामना करायचा आहे.