राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना नोटीस पाठवत मागितला खुलासा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ नोव्हेंबर । शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात.आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे हे मंगळवारी (दि.1)रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेले होते. तेथून बाहेर पडत असताना एका महिला पत्रकार सोबत बोलताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटले. आता यावरूनच राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना नोटीस पाठवत खुलासा मागितला आहे.

राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना नोटीसमध्ये म्हटले आहे की,महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.आपले हे वक्तव्य स्त्री मनाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे त्यामुळे या भूमिकेबाबत तत्काळ खुलासा करावा असे राज्य महिला आयोगाने सांगितले आहे.

नेमके प्रकरण आहे तरी काय?एका खाजगी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना थांबवून प्रतिक्रिया विचारले असता ते म्हणाले,आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे भारत माता विधवा नाही .टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलतो,असे विधान करून संभाजी भिडे निघून गेले.त्यांच्या या विधानावरून आता नव्याने वाद सुरू झाला आहे. याचाच खुलासा आता राज्य महिला आयोगाने संभाजी भिडेना नोटीस द्वारे मागितला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *