प्रताप सरनाईक पुन्हा ईडीच्या रडारवर ; ११ कोटींची संपत्ती जप्त होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ नोव्हेंबर । प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा सक्तवसुली संचनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आले आहेत. सरनाईकांची ११ कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं वृत्त आहे. (Pratap Sarnaik)

प्रताप सरनाईक हे शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाले होते. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर मधल्या काळात सरनाईकहे पक्षातून बाजूला पडले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आमदार प्रताप सरनाईकहेदेखील शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यामुळं ईडीची कारवाई थांबली की काय? असा सवाल शिवेसेनेनं केला होता. मात्र, आता पुन्हा सरनाईक ईडीच्या रडारवर आले आहेत.

सॅलरी डेजमध्ये 1 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत अप्लायन्सेसवरील सर्वोत्तम डील शोधा, सॅमसंग, LG, लॉयड आणि इतर अनेक ब्रँड्सवर 40% पर्यंत सूट मिळवा!

ईडीने जप्त केलेली ११. ४ कोटींची संपत्ती योग्य असलाचा निर्णय क्वाशी ज्युरीशरी बॉडीने दिला आहे. प्रताप सरनाईक यांची NSEL घोटाळा प्रकरणात ११.४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मार्चमध्ये ईडीने त्यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोडमधील जमिनीचे प्लॉट जप्त केले होते. या कारवाईविरोधात सरनाईक यांनी क्वाशी ज्युरीशरी बॅाडीकडे आव्हान दिले होते. मात्र, ईडीची जप्तीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यानंतर आता जप्त केलेली संपत्ती ईडी ताब्यात घेणार आहे.

एनएसईएल मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांची ११.४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची पुष्टी ईडीने केली आहे.२०१६मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीआधारे आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी एनएसईएल प्रकरणात त्याचे संचालक आणि एनएसईएलचे प्रमुख अधिकारी एनएसईएलचे २५ जणं आणि इतरांवर मनी लाँड्रिंग तपास सुरू केला होता. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला, त्यांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले आणि बोगस वेअरहाऊस पावत्यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केली, बनावट खाती तयार केली, असे आरोप या प्रकरणात करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *