मी, फडणवीस, सीएम एकत्र बघून लोकांना वाटेल एकावर एक फ्री आहे का? ; राज ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले. त्यांचे आणि आमचे आधी कार्यक्रम एकत्र झाले. मला असे वाटले की, या कार्यक्रमाला येऊ की नको. कारण लोकांना वाटायचे की, एकावर एक फ्री मिळतेय का? आम्ही दीपोत्सवाला एकत्र होतो. लोकांना वाटणार की, हे आले म्हणजे ते येणार, अशी कोपरखळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मारली. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या एका नाटकाचे १२,५०० प्रयोग झाले. त्या प्रयोगानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली. राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडे कलाकारांना महत्त्व दिले जात नाही. आपल्याकडे जेवढ्या प्रतिमा जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. त्यामुळे आपल्याकडे पूल, शाळा आणि रस्त्याला नावे द्यायला तीस-तीस लोक आठवतात. तसेच निवडणुकीनंतर लोक जे म्हणतात ते आज आम्ही म्हणणार आहोत. आमच्या हाती काय आले, तर घंटा. पण घंटा-घंट्यातील फरक आहे. ही वाजवायची घंटा आहे. ती नाटकाची आहे. सध्या आर्शिवाद देण्यासाठी मोठे व्यक्ती राहिले नाही.

मी दामलेंएवढा फेमस नाही

‘मी प्रशांत दामलेंएवढा फेमस नाही. साडेतीन महिन्यांपूर्वी आम्ही एक महानाट्य केले. त्याचे पडसाद आजही राज्यात, देशात अन् जगभरात उमटत आहेत. तेव्हा मी थोडा फेमस झालो होतो, अशी टिप्पणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते म्हणाले की, प्रशांत दामलेंसारखे कलावंत ऊर्जा देणारे आहेत. आता आमच्याकडे ठाण्यात सर्व शूटिंगला येतात. ठाणे व मुंबईदरम्यान चित्रनगरी उभारणार आहोत. राज्याला केंद्राची साथ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *