Gold-Silver Price : आठवड्याच्या सुरवातीला सोने-चांदीचे दर स्थिर ; पाहा आजची किंमत काय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,००० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६०,००० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.                                                                             

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३१० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,००० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,२८० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०५ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *