Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीचा बाबर आझमला सल्ला, “या फलंदाजाला रिझवानसोबत ओपनिंग पाठवावे”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी टीमला सल्ला द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान टीमने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये (Match) खराब कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांचा महत्त्वाच्या मॅचमध्ये पराभव झाला. परंतु पाकिस्तान टीम पुन्हा चांगली खेळी करु लागल्याने दिग्गज खेळाडूंनी टीमला सल्ला देणे सुरु केले. पाकिस्तान टीमचा माजी खेळाडू शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) याने सुद्धा एक सल्ला दिला आहे.

आफ्रिदी वादग्रस्त वक्तव्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. त्याने विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून अनेकदा पाकिस्तान टीमला सल्ला दिला आहे. तसेच तो वारंवार टीममध्ये काय बदल करायचा हे सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतो.

नुकताच आफ्रीदीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला एक सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ला दिला आहे. मोहम्मद हारिसला रिझवानसोबत ओपनिंगला फलंदाजी करण्यासाठी पाठवा. एक विकेट पडल्यानंतर तुम्ही फलंदाजीसाठी जा, टीम संतुलित ठेवणं सध्या अधिक गरजेचं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *