Chhagan Bhujbal: प्रकृती बिघडली; छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ नोव्हेंबर । नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ आज सकाळीं बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Chhagan Bhujbal admitted to bombay hospital )राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील काही दिवसांपासून रुग्णालयात होते. आजच त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज छगन भुजबळ रुग्णलयात दाखल झाले आहेत. भुजबळ गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात मास्क वापरत असल्याचे दिसून येत होते.

आज अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून ते मास्क वापरात आहेत. त्यानंतरच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्या कार्यक्रमांत त्यांनी मास्क वापरत होते. छगन भुजबळ यांचा 75 वा वाढदिवसा दरम्यान भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्या दरम्यान अनेकांच्या भुजबळ संपर्कात आल्याने आठ ते दहा दिवस भुजबळ आजारी होते. त्यावेळी देखील भुजबळ काही दिवस मुंबईत उपचार घेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *