सेमी फायनलमध्ये पाकिस्तान छुपं अस्त्र बाहेर काढणार ; बाबर-रिझवान फ्लॉप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ नोव्हेंबर । टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्या उपांत्य लढतीत बुधवारी आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येत आहेत. स्पर्धेस सुरुवात झाल्यापासून न्यूझीलंड संघ आपण उपांत्य फेरीतील संघांचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवत होता. त्याचवेळी न्यूझीलंडची भक्कम वाटचाल रोखण्याचे आज पाकिस्तानचे लक्ष्य आहे. दोन्ही संघामध्ये आज दुपारी १.३० वाजता सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघाकडे एकापेक्षा एक भक्कम खेळाडू आहेत. मात्र, या एका खेळाडूकडून पाकिस्तानी संघाला फार आशा आहेत.

टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि अनुभवी यष्टीरषक मोहमद रिझवान यांना अपेक्षित खेळ दाखवता आला नाही. वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत बाबर आझमने ३९ धावा (०.४,४,६,२५) काढल्या आहेत. तर , रिझवानने पाच सामन्यात १०३ धावा मिळवल्या आहेत. त्यामुळं आता पाकिस्तान संघाची फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एका खेळाडूवरच भिस्त आहे. याच खेळाडू पाकिस्तानचा विजय मिळवून देऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

फखर जमान जायबंदी झाल्यानंतर संघात २१ वर्षीय तरुण फलंदाजाची एन्ट्री झाली आहे. मोहम्मद हारिसने आपल्या खेळाने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. हारिसने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात ११ चेंडूंमध्ये २५४.५४चा स्ट्राइक रेटने २८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात १८ चेंडूंमध्ये ३१ धावा काढल्या होत्या.

दरम्यान, पाकिस्तानी संघातील प्रत्येक खेळाडूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र, हारिस मैदानात उतरताच विरुद्ध संघाच्या गोलंदाजांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. हारिसच्या खेळाचे कौतुकही होत आहे. त्यामुळं पाकिस्तानी चाहत्यांना आशा आहे की हारिसच्या तडाखेबंद खेळीमुळं संघ फायनलमध्ये धडक देऊ शकतो. हारिसच्या खेळीमुळं पाक बाजी मारु शकतो, अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

सिडनीत न्यूझीलंडची कामगिरी उंचावलेली. याच मैदानावर ग्लेन फिलिप्सच्या श्रीलंकेविरुद्ध ६४ चेंडूंत १०४; तसेच डेव्हॉन कॉन्वेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५८ चेंडूंत ९२ धावा. टीम साउदीचा पाकिस्तानविरुद्ध २.१ षटकांत २.७६चा इकॉनॉमी रेट. न्यूझीलंडने प्रतिस्पर्धी संघात जास्त डावखुरे असतानाही मायकेल ब्रेसवेलला संघात घेणे टाळले. पाकिस्तानविरुद्धही त्याच्या समावेशाची शक्यता कमी. त्यामुळे संघात बदलाची शक्यता कमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *