महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ नोव्हेंबर । ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. ED ने कोर्टाविरोधात केलेलं अपीलही फेटाळण्यात आल्यामुळे संजय राऊत यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात आपील करायचं असल्यानं संजय राऊत यांच्या जामिनाच्या अंमलबजावणीला एका आठवड्याची स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीच्या वतीनं करण्यात आली होती. या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र इडीची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. इडीची मागणी फेटाळण्यात आल्यानं संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. मात्र आम्हाला जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करायचं आहे. त्यामुळे न्यायालयाने राऊत यांच्या जमीन मंजुरीच्या निर्णयाला एका आठवड्याची स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीने केली होती. ईडीच्या या मागणीवर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावत संजय राऊत यांना मोठा दिसाला दिला आहे.