आता ट्विटरसाठीही मोजावे लागणार पैसे ? : मस्क यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । ट्विटरच्या व्हेरिफाइड युजर्सना दरमहा ८ डॉलर शुल्क आकारण्याचा विरोध होत असला तरी कंपनीचे नवे मालक एलन मस्क हा निर्णय लागू करण्यास कटिबद्ध आहेत. इतकेच नाही तर आता ट्विटर व्हेरिफाइड नसलेल्या युजर्ससाठीही पेड सब्सक्रिप्शनचा विचार करत आहे. नुकतीच मस्क यांनी वरिष्ठ व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत यावर विस्ताराने चर्चा केली होती. नव्या नियोजनांतर्गत युजर्सना ट्विटरवर नियमित काळासाठीच मोफत अॅक्सेस मिळेल. त्यानंतर सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी युजर्सना सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. तथापि, मोफत अॅक्सेस किती कालावधीसाठी असेल आणि शुल्क किती राहील, हे अद्याप ठरले नाही. सध्या कंपनी व्हेरिफिकेशन सब्सक्रिप्शन फीचरवर काम करत आहे.

ट्विटरमुळे रोज ४० लाख डॉलर नुकसान, मस्क यांनी ५ दिवसांतच विकले टेस्लाचे १.९५ कोटी शेअर : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी आपली इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे १.९५ कोटी शेअर विकले आहेत. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनी १.९५ कोटी शेअर ४ ते ८ नोव्हेंबरदरम्यान विकले. त्यांची किंमत जवळपास ३.९५ अब्ज डॉलर आहे.

‘मेटा’मध्ये कपात, फेसबुकचे ११ हजार कर्मचारी काढणार ट्विटरच्या धरतीवर फेसबुकची मूळ कंपनी मेटाही ११ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कंपनीच्या महसुलात घसरणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग म्हणाले, मी मेटाच्या इतिहासात सर्वात कठिण बदल शेअर करत आहे. मी माझी टिम सुमारे १३ टक्क्यांनी लहान करण्याचा व ११ हजारांहून अधिक प्रतिभावंत कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्वांसाठी कठिण आहे. २००४ मध्ये सुरू झालेल्या फेसबुकमध्ये सुमारे ८७ हजार कर्मचारी काम करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *