महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संजय राऊतांना काल तब्बल १०३ दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आला.. मात्र राऊतांसमोरच्या अडचणी संपल्यात असं म्हणता येणार नाही. कारण ईडीनं राऊतांच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.. ज्यावर आज सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालय विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवणार की राऊतांच्या जामिनाला स्थगिती देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.. दरम्यान काल विशेष न्यायालयानं ईडीला फटकारलं, राऊतांची अटक ही अवैध होती अस ताशेरे विशेष न्यायलयाने ओढलेत.