महाराष्ट्र २४- मालेगाव – विशेष प्रतिनिधी ;मालेगाव शहरात करोनाला रोखण्यासाठी यंत्रणांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी वाढत्या रुग्णसंख्येला रोखणे अजूनही शक्य झालेले नाही. मंगळवारी रात्री ३७ रुग्ण वाढताच धसका घेतलेल्या मालेगावकरांना आज पुन्हा मोठा धक्का बसला. बुधवारी तीन वेळा आलेल्या अहवालात तब्बल ३२ रुग्णांची वाढ झाली. आता शहरातील रुग्णसंख्या तब्बल ४१६ पर्यंत पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत ६७ नवीन रुग्णांची वाढ झाली.
बुधवारी (दि. ६) सायंकाळी ८पर्यंत ३२ नवे रुग्ण आढळून आलेत. मात्र मंगळवारी रात्री उशिरा (दि. ५) दोन टप्प्यात अहवाल प्राप्त झालेत. यात आधी १६ व नंतर ३६ नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मालेगाव शहराची रुग्णसंख्या ४०४ झाली होती. त्यात बुधवारी ३२ रुग्णांची वाढ झाली. तिकडे दाभाडीत देखील एक रुग्ण वाढला असून येथील रुग्णसंख्या ९ झाली आहे. करोनामुळे मालेगावात १४ रुग्ण दगावले असून २८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णसंख्येचा वाढता आलेख रोखण्याचे आवाहन प्रशासनापुढे कायम आहे.