महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – कोरोना संकटामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत,अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३ व्यक्तींना ताब्यात घेतले गेले.
राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३ व्यक्तींना ताब्यात घेतले गेले.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 6, 2020
राज्यात लॉकडाऊनच्या २२ मार्च ते ५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ९५,६७८ गुन्हे नोंद झाले आहेत. १८,७२२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ३८ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबरवर अनेक तक्रारांचे कॉल्स आले आहेत. ८४,९४५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.