मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठा घाट फक्त २ मिनिटांत होणार पार, ‘या’ तारखेपर्यंत होईल काम पूर्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर । मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गावरील हा कशेडी घाट अवघड वळणांचा जवळपास १३ किमी इतका लांब आहे. या घाटात आजवर अनेक दुर्देवी अपघात घडलेत. या सगळ्याला पर्यायी मार्ग असावा असा विचार सुरू होता. तेव्हा डोंगरामधून बोगदा तयार केल्यास हे अंतर कमी होईल आणि चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

यामुळे आता जो कशेडी घाट पार करायला तब्बल पाऊण तास लागतो ते अंतर आता केवळ सहा ते सात मिनिटांवर येणार आहे. थेट या बोगद्यातून पोलादपूरजवळ बाहेर पडता येईल. कशेडी बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून येत्या मार्च अखेरपर्यंत बोगद्याची एक लेन वाहतुकीसाठी खुली होणार आहे.

सद्य:स्थितीत बोगद्याचे जोड रस्ते आणि अंतर्गत रस्त्याचे काम शिल्लक असून, अल्पावधीत हे काम पूर्ण करून मुंबईकर चाकरमान्यांना कशेडी बोगदा या वर्षीच्या उन्हाळ्यात खुला होईल. यामुळे कशेडी घाट अवघ्या ४५ मिनिटांत पार होईल तर रत्नागिरी रायगड जिल्ह्याशी अवघ्या दीड मिनिटांत जोडला जाईल. तब्बल ४४१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून रत्नागिरी जिल्ह्यासह चाकरमान्यांना मुंबई अधिक जवळ येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *