Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ नोव्हेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हर हर महादेव चित्रपटावरून चित्रपटगृहात गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याच सांगण्यात येत आहे. चित्रपटगृहात एका तरुणाला मारहाण झाली होती. शिवाय शो देखील बंद करण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद झाला होता. आव्हाड यांना वर्तकनगर पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.

यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला पोलिसांनी सांगितलं की, तुम्हाला अटक करावं लागेल. चित्रपटातून संपूर्ण मराठा समाजाचा अपमान केला गेला आहे. शिवाजी महाराजांना बदनाम करण्यात येत आहे. त्याला विरोध करण्यासाठी कारागृहात जावं लागत असेल तर मी सहज जाईल. जामिनासाठी देखील अर्ज करणार नाही, असंही आव्हाड म्हणाले.

आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल.पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असंही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *