महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – : राज्यात करोनाचे बुधवारी सर्वाधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत राज्यभरात १,२३३ रुग्ण आढळल्याने राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १६,७५८ वर पोहोचली. राज्यात बुधवारी करोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील २५ जणांचा समावेश आहे. राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ६५१ वर पोहोचली आहे. राज्यातील परिस्थितीवर केंद्रानंही चिंता व्यक्त केली असून, करोनाचा प्रसार थोपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे.