Jitendra Awhad : आव्हाडांनी पूराव्यासह सांगितलं चित्रपटाला विरोध का ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ नोव्हेंबर । ठाण्यातल्या विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर झाला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय व्हिडीओ दाखवून आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटाला आपला विरोध का, हेही सांगितलं. (Jitendra Awhad news in Marathi)

आव्हाड यांनी जुन्या चित्रपटातील काही क्षणचित्र दाखवले. त्यानंतर हर हर महादेव चित्रपटातील अफजल खान वधाची क्षणचित्रे दाखवली. तसेच आपलाविरोध का हे स्पष्ट केलं. आव्हाड म्हणाले की, माझा मारामारीशी काहीही संबंध नाही. तक्रार करणाऱ्यानेच हे सांगितलं. मात्र मला आत कसं बसवता येईल, यासाठी विचार करण्यात येत आहे. त्यामुळे माझ्यावर क्रिमीनल ऍक्ट लावला. कुणाच्या तरी दबावामुळेच आपल्याला अटक करण्यात आल्याचं आव्हाड यांनी नमूद केली.

शिवाजी महाराजांनी अफजल खानाला हर हर महादेव चित्रपटात दाखल्याप्रमाणे मारलं होत का? शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची लढाई झाली होती का? अफजल खानाची संपूर्ण माहिती शिवाजी महाराजांना बाजीप्रभू देशपांडेंना कोणी दिली होती का? असे प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले.

आव्हाड म्हणाले की, चुकीचा इतिहास दाखवण्यात आला. मराठ्यांचे पाटील बायकांचा बाजार करतात, असा दावा करण्यात आला. मुद्दामहून मराठ्याचं शौर्य कमी करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यता आल्याचंही आव्हाड यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *