फायनलपूर्वी पाकिस्तानला बसला मोठा धक्का, इंग्लंडचा मॅचविनर खेळाडू आता संघात परतला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ नोव्हेंबर । फायनल सुरु होण्यापूर्वी आता पाकिस्तानच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडच्या संघात आता ेक मॅचविनर खेळाडू परतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघासाठी ही एक धोक्याची घंटा समजली जात आहे.

पाकिस्तानचा संघ आता फयानलसाठी सज्ज होत असताना त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्दनकाळ समजला जाणारा खेळाडू आता इंग्लंडच्या संघात परतला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या संघाचे धाबे दणाणले आहेत. कारण आतापर्यंत या विश्वचषकात तब्बल ९ विकेट्स या एकट्या खेळाडूने पटकावलेले आहेत.

इंग्लंडचा संघ मंगळवारी आता सराव करत होता. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड हा जायबंदी झाला असल्याचे समोर आले होते. सराव करत असताना मार्क वुडला गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची होती की, त्याने सराव करणे तात्काळ सोडून दिले आणि त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली होती. त्यामुळे ही दुखापत आता गंभीर स्वरुपाची असल्याचे दिसत होती आणि त्यामुळेच त्याला भारताविरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. पण आता वुड फिट झाला आहे आणि पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी त्याने नेट्समध्ये सराव केला आहे. त्यामुळे आता वुड्स सराव केल्यावर फिट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये वुडला संधी देण्यात येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत वुडने आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये ९ विकेट्स मिळवले आहेत. त्यामुळे आतापर्यंत विश्वचषकात त्याने अचूक आणि भेदक मारा केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे इंग्लंड या मॅचविनर खेळाडूला फायनलसारख्या सामन्यात संधी देण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत. त्यामुळे आता वुडला इंग्लंडच्या संघात संधी द्यायची असेल, तर कोणत्या संघाला विश्रांती द्यायची, हा मोठा प्रश्न आता संघ व्यवस्थापनासमोर असणार आहे. त्यामुळे जर वुडला संघात स्थान द्यायचे असेल तर कोणता खेळाडू संघाबाहेर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण शक्यतो सामना जिंकलेला संघ बदलला जात नाही, पण फायनलमध्ये आता इंग्लंड काय करणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *