पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार! बुलेटस्वारांचा ग्रूप हळहळला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । मुंबई गोवा महामार्गावर कणकवली (Kankavali) जवळ एका रॉयल इनफिल्ड (Royal Enfield Bike) बाईकचा भीषण अपघात (Mumbai Goa accident News) झाला. या अपघातात तरुणाचा मृत्यू झालाय. हा अपघात इतका जबर होता की बाईकस्वार तरुणाचा जागीच जीव गेलाय. कणकवली वागदे पेट्रोल पंपासमोर ही दुर्दैवी घटना गुरुवारी घडली.

बुलेटस्वार तरुणाचा ग्रूप हा मुंबई गोवा हायवेवरुन जात होता. अभिषेक संजय देसाई हा पुण्यातील हडपसर येथील 22 वर्षीय तरुणही या ग्रूपसोबत प्रवास करत होता. पण या प्रवासादरम्यान काळानं त्याच्यावर घाला घातला.संध्याकाळी सहा साडे सहा वाजण्याच्या दरम्यान अभिषेकचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याची बाईक अपघातग्रस्त झाली. रॉयल एनफिल्डच्या कार्यक्रमासाठी अभिषेख पुण्याहून गोव्याला जात होता. बुलेटस्वार तरुणांच्या ग्रूपसोबत अभिषेकही सोबत निघाला होता.

एका वाहनाला ओव्हरटेर करण्याच्या नादात अभिषेकचं बुलेटवरील नियंत्रण सुटलं आणि त्याचा बाईकवरील तोल जाऊन तो खाली कोसळला.

22 वर्षीय अभिषेकच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या अपघातामुळे बुलेटस्वार तरुणाच्या ग्रूपमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. हे सर्व दुचाकीस्वार पुणे ते गोवा असा बुलेटवरुन प्रवास करत होते. मात्र त्यांच्या या प्रवासाला गालबोल लागलंय. या अपघाताची सिंधुदुर्ग महामार्ग पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास केला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *