IND vs NZ, Pitch Report : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी20 मध्ये कशी असेल मैदानाची स्थिती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ नोव्हेंबर । टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतर आता भारत पुन्हा टी20 सामने खेळत आहे. भारतासमोर आता न्यूझीलंड (India vs New Zealand) संघाचं आव्हान असून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यावर दुसरा सामना भारताने जिंकला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना आज नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर आजच्या या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.

सामना होणाऱ्या मॅकलिन पार्क येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अनुकूल आहे ज्यामुळे याठिकाणी पुन्हा एकदा फलंदाजांना मदत होईल अशी अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाजांना सामन्याच्या उत्तरार्धात अर्थात सेकंड इनिंगमध्ये काही मदत मिळू शकते, तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू महत्त्वाची कामगिरी बजावतील. बे ओवलची खेळपट्टीही अशी असल्याने एक मोठी धावसंख्या भारताने उभारली होती, सूर्यकुमारने नाबाद 111 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. आजही तशी एक मोठी खेळी पाहायला मिळू शकते.

कसा आहे आजवरचा इतिहास?

टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ यांच्यात आतापर्यंत 21 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 21 पैकी 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. नुकताच पावसामुळं एक सामना रद्दही झाला होता.

कसा आहे भारतीय संघ?

हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

डीडी स्पोर्ट्सवर पाहता येणार सामना

भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी20 सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *