जय मल्हार ; आजपासून खंडोबा षड्‌त्रोत्‍सवास प्रारंभ; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ नोव्हेंबर । अवघ्‍या महाराष्‍ट्राचे लोकप्रिय दैवत म्‍हणून खंडोबा प्रसिद्ध आहे. सर्व थरात खंडोबा दैवताची उपासना केली जाते. खंडोबा षड्‌रात्रोत्‍सव हा मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुध्द षष्‍ठी असा सहा दिवस साजरा केला जातो. गुरुवार (ता. २४) पासून षड्‌त्रोत्‍सवास प्रारंभ होत आहे. तसेच गुरुवारी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेस देवदिवाळी साजरी केली जाते. (Khandoba Shadtrotsava starts from today Excitement everywhere )

गेल्‍या आठ दिवसांपासून शहरातील खंडोबाची मंदिरांना रंगरंगोटी करून विद्युत रोषणाईने मंदिरे सजविण्यात आली आहे. षड्‌त्रोत्‍सवासाठी सर्व मंदिरे सज्‍ज झाली असून, सर्वत्र उत्‍सवाचे स्‍वरूप आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *