शिलेदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुन्हा गुवाहटीत

 62 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ नोव्हेंबर । ज्या गुवाहटीत (Guwahati) 6 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तांतर (Maharashtra politics) नाट्याचा महाप्रयोग रंगला, त्याच गुवाहटीकडे आज राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. कारण पक्षातील महत्त्वाच्या आमदारांच्या ताफ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गुवाहटी दौऱ्यावर निघाले आहेत. कारण सांगितलंय, पर्यटन विकासासाठीच्या दौऱ्याचं.

पण महाराष्ट्रात सत्तांतर होण्यासाठीच्या प्रयत्नांना यश येऊ दे, हे साकडं ज्या कामाख्या देवीला घातलं… त्यासाठी जे नवस बोललं, ते फेडण्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे आपल्या शिलेदारांसह पुन्हा एकदा देवीच्या दर्शनासाठी जात आहेत… कुठे दबक्या तर कुठे स्पष्ट छातीठोकपणे सांगितलं जातंय. उद्या 26 आणि 27 नोव्हेंबरचा हा दौरा आहे. शिंदे यांच्यातर्फे दोन खास विमानं तयार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.