महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली न्यायालयाने शनिवारी 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले. आफताबला तिहारच्या तुरुंग क्रमांक 4 मध्ये ठेवण्यात आले आहे, जेथे पहिल्यांदाच गुन्हा केलेल्या गुन्हेगारांना ठेवले जाते.
आफताबला 12 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. तो आतापर्यंत 10 दिवस पोलिस कोठडीत होता. यावेळी त्याची चौकशी आणि पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. पॉलीग्राफ चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची नार्को चाचणीही केली जाणार असून, त्याला न्यायालयाने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
कारागृहाबाहेर 24 तास गार्ड तैनात असेल
तुरुंगातील सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, आफताब तुरुंग क्रमांक 4 मध्ये एकटाच राहणार आहे. स्वतंत्र कोठडीत एकच कैदी राहणार असून त्याला या सेलमधून लवकर हटवले जाणार नसल्याचे सूत्राने सांगितले. पोलिसांच्या उपस्थितीतच आफताबला जेवण दिले जाईल. त्याच्या कक्षाबाहेर 24 तास एक गार्ड तैनात असेल. येथे 8 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे आरोपींवर 24 तास नजर ठेवली जाणार आहे.
श्रद्धा खून प्रकरणाचे लेटेस्ट अपडेट्स…
# श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबच्या फ्लॅटवर आलेल्या तरुणीची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली आहे. तरुणीला श्रद्धाबद्दल काही माहिती आहे की नाही, याचा शोध पोलीस घेत आहेत.
# श्रद्धाच्या हत्येनंतर आरोपी आफताबने मानसशास्त्रज्ञ असलेल्या डॉक्टरला डेट केले होते. बंबल या डेटिंग अॅपद्वारे तो तिला भेटला. श्रद्धाच्या शरीराचे अवयव फ्रीजमध्ये ठेवले होते तेव्हा तिला त्याच्या घरी बोलावले होते.
# मेहरौली जंगलात सापडलेले मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. डीएनए चाचणीसाठी श्रद्धाचे वडील आणि भावाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. याच चाचणीवरून कळेल की, बॉडी पार्टस श्राद्धाचे आहेत की नाही. सध्या पोलीस डीएनए रिपोर्टची वाट पाहत आहेत.