पुणे जिल्ह्यात गोवरचा शिरकाव ; पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी पाच रुग्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० नोव्हेंबर । मुंबईकरांची झोप उडविणार्‍या गोवरने अखेर पुणे जिल्ह्यात शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पाच बालकांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मंगळवारी खळबळ उडाली. पाच संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह आले असून उद्रेक होऊ नये, यासाठी पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गोवर आजाराच्या सातपैकी पाच संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह आहेत. कुदळवाडी परिसरातील बालकांना लागण झाली आहे. या रुग्णांची रक्त तपासणी व घशातील द्रावाची तपासणी मुंबई येथील हाफकिन येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून कुदळवाडी परिसरात गोवर या आजाराचा उद्रेक घोषित करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये गोवर या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड परिसरात गोवरचे रुग्ण आढळल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात गोवरचे तीन रुग्ण आढळले होते. तर, मंगळवारी (दि. 29) पाच रुग्णांच्या घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. राज्यातील इतर शहरात गोवरचे रुग्ण आढळू लागल्यानंतर महापालिकेकडून रहिवाशी क्षेत्रात गोवर आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यात येणार्‍या क्षेत्रामध्ये नऊ महिने ते 5 वर्ष या वयोगटातील गोवरसदृश आजाराची लक्षणे आढळून येणार्‍या बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यांच्या गोवर प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच, ज्यांनी गोवर लसीकरणाचे डोस घेतलेले नाही, त्या बालकांना अ जीवनसत्त्वाचा डोस देण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

लागण झालेल्या बालकांनी लस घेतलेले नव्हती. व्यवसायानिमित्त पालकांचा सतत पुणे-मुंबई असा प्रवास सुरू असल्यामुळे या बालकांना मुंबईमध्ये लागण झाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसून ते रहात असलेल्या परिसरात याबाबत काळजी घेतली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गोवरसदृश आजाराची लक्षणे आढळून येणार्‍या बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यांच्या गोवर प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच, ज्यांनी गोवर लसीकरणाचे डोस घेतलेले नाही, त्या बालकांना अ जीवनसत्त्वाचा डोस देण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *