Vikram Kirloskar Passes Away: टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० नोव्हेंबर । टोयोटा किर्लोस्कर मोटर प्राइवेट लिमिटेडचे ( TOYOTA ) उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी त्यांची देशभरात विशेष ओळख होती. प्राथमिक स्तरावर हाती आलेल्या माहितीनिसार मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांची प्राणज्योत मालवली. (Vice Chairperson of Toyota Kirloskar Motor Vikram Kirloskar passed away)

सोशल मीडियाच्या माध्यमातून टोयोटा इंडियाच्या वतीनं ट्विट करत यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ‘टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं 29 नोव्हेंबर 2022 ला निधन झाल्याचं सांगताना आम्हाला प्रचंड दु:ख होत आहे. सध्या किर्लोस्कर यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत आम्ही सर्वचजण आहोत. विक्रम किर्लोस्कर यांच्यावर 30 नोव्हेंबरला त्यांच्यावर बंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत’, असं या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं होतं.

विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात त्यांची पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. विक्रम यांनी मॅसाचुय्सेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतून पदवी शिक्षण घेतलं होतं. गेल्या काही वर्षांत त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. किर्लोस्करांच्या चौथ्या पिढीचं ते नेतृत्त्वं करत होते. किर्लोस्कर सिस्टीम्स लिमिटेडच्या अध्यक्ष आणि संचालकपदाचाही कार्यभार ते सांभाळत होते. नुकत्याच पार पडलेल्या Toyota Innova HyCross कार्यक्रमानिमित्त ते मुंबईत आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *