![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० नोव्हेंबर । राज्यात विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात मंगळवारी किमान तापमान घसरल्याने थंडीचे पुन्हा आगमन झाले. जळगाव, औरंगाबादेत नीचांकी १२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.नाशकात पारा १.६ अंशाने घसरून १३ अंशावर आला होता. दरम्यान, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे बुधवारपासून येत्या ४ डिसेंबरपर्यंत राज्यात थंडीचा कडाका राहील.
दिल्लीत मंगळवारी सकाळी किमान तापमान ७.३ अंश सेल्सियस नोंदवले. नोव्हेंबर महिन्यात २०१७ नंतरचे हे सर्वात कमी तापमान आहे. हवामान विभागानुसार, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचलमध्ये डोंगरांवर बर्फवृष्टीमुळे थंडी वाढू शकते.
इथे गारठा
पश्चिमेकडील थंड हवेमुळे पंजाब, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातही वेगाने थंडी पडत आहे. या राज्यांमध्ये थंडी आणखी वाढणार आहे.
इथे पाऊस
खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदरनुसार, तामिळनाडू, तटीय, दक्षिण कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान निकाेबार द्वीप समूहामध्ये पाऊस झाला. तर यूपी, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालच्या काही भागांत धुके दाटले आहेत.