महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ डिसेंबर । हायवे म्हणजे कमी वेळेत जास्त अंतर तोडण्याचा मार्ग, त्याचबरोबर अपघातांचाही मार्ग असतो. हायवेवर पोहोचताच लोक गाडीचा वेग असा काही वाढवितात की, मागचा लागलेला वेळच नाही तर पुढचा वेळही कव्हर करतात. परंतू एक्स्प्रेस हायवेवरही वेगाची मर्यादा आहे. तरीही मनावर ताबा राहिला नाही तर बंद काचांमध्ये वेगाची नशा कळत नाही, आणि ही मर्यादा ओलांडली जाते.
तुम्ही जेव्हा तुमची कार हायवेवर घेऊन जाता तेव्हा एका गोष्टीकडे लक्ष द्या. जर तुमची कार व्हायब्रेट करू लागली किंवा थरथरू लागली तर तो धोक्याचा संकेत असतो. कारचा वेग ६० किमीच्या वर गेला की ही कंपने जाणवू लागतात. असे का होते? रस्ता खडबडीत असतो मान्य पण त्यामागे गाडीतील एक कारणही आहे. ही समस्या दूरही करता येते.
हे व्हायब्रेशन का जाणवते याचे कारण जाणणे गरजेचे आहे. जसा तुम्ही वेग ६० किमीच्यावर नेता तसा हे जाणवू लागते. पर्यावरण संरक्षण एजन्सीने यावर संशोधन केले आहे. सरासरी वाहनाचे वजन 1,885 किलोग्राम असते. परंतू जेव्हा ६० किमीच्या वेगाने कार धावू लागते तेव्हा ती गाडी 50,560 किलो ग्रॅमचा वेग निर्माण करते. यामुळे कारला नियंत्रित करणे अवघड होऊ लागते. यामुळे असंतुलित टायर, कर्ब प्रेशर, सस्पेंशन खराब होणे आणि तोल गमावणे या लक्षणांचा समावेश होतो. या कारणांमुळे गाडी जास्त बाऊन्स होऊ लागते. यामुळे आत बसलेल्या व्यक्तींना कंपने जाणवू लागतात.
ही कंपने कमी करण्यासाठी काही उपाय करावे लागतील. जसे चाक फिरू लागले तसे टायर वळवळू लागतो. यामुळे आतून आणि बाहेरून दबाव वाढू लागतो. व्हील बॅलन्सिंगने ही समस्या दूर केली जाते. वाहनाची सर्व्हिसिंग करताना नेहमी ५००० किमी अंतरानंतर हे करणे गरजेचे असते
गाडीचे सस्पेंशनदेखील खराब झालेले असेल तर कंपने जाणवतात. गाडी स्मूथ चालण्यासाठी सस्पेंशनमध्ये शॉक अब्झॉर्बर आणि कॉईल स्प्रिंग दिलेली असते. काळानुसार त्याला गंज चढू लागतो. यामुळे या सस्पेंशनची नेहमी तपासणी करावी. याचबरोब कोणत्याही कारची व्हील बेअरिंग योग्य आकाराची असणे गरजेचे आहे. खराब रस्त्यांवर जास्त वाहन चालत असेल तर व्हील बेअरिंगवर दबाव पडून ती लवकर खराब होते. यामुळे झटके बसणे सुरु होते.