FIFA World Cup 2022 : आता उद्यापासून उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींचा थरार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ डिसेंबर । FIFA World Cup Qatar 2022 quarterfinals: फिफा फेरीच्या लढतींचा थरार आता रंगणार आहे. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती मंगळवारी मध्यरात्री संपल्या. शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या आठ देशांपैकी पाच देश हे युरोप खंडातील आहेत. यामध्ये क्रोएशिया, नेदरलँड्स, पोर्तुगाल, इंग्लंड व फ्रान्स या बलाढ्य देशांचा समावेश आहे. यामधील दोन देश हे दक्षिण अमेरिकेतील आहेत. ब्राझील व अर्जेंटिना या देशांचा त्यामध्ये समावेश आहे. आफ्रिका खंडातील एकमेव देश मोरोक्कोच्या रूपात या वेळी दिसत आहेत. मोरोक्कोचे यश वाखाणण्याजोगे आहे.

हेही वाचा: Rohit Sharma: मालिका गमावल्यानंतर कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूंवर फोडले पराभवाचे खापर

युरोपचीच मक्तेदारी २००२ मध्ये ब्राझीलने विश्वकरंडक जिंकला होता, पण त्यानंतर २००६ मध्ये इटली, २०१० मध्ये स्पेन, २०१४ मध्ये जर्मनी व २०१८ मध्ये फ्रान्सने विश्वकरंडकाच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. यंदाही युरोप खंडातील पाच देश उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे सलग पाचव्यांदा युरोप खंडातील देशांकडेच फिफा अधिक आहे.

विश्वकरंडक राहण्याची शक्यता

ब्राझील, अर्जेंटिनाही दावेदार दक्षिण अमेरिकन खंडातील देशांनी विश्वकरंडक जिंकून २० वर्षे उलटून गेली. ब्राझीलने २००२ मध्ये; तर अर्जेंटिनाने १९८६ मध्ये जागतिक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते.

हे दोन्ही देश जेतेपदावर हक्क सांगण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये हे दोन्ही संघ कशी कामगिरी करताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मोरोक्को इतिहास रचणार ?

मोरोक्को हा आफ्रिकन खंडातील देश. आफ्रिकन खंडामधून कॅमेरून, सेनेगल व घाना या तीन देशांनंतर मोरोक्कोने फिफा विश्वकरंडकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे; मात्र कॅमेरून, सेनेगल व घाना यांच्यापैकी एकाही देशाला पुढे जाऊन उपांत्य किंवा अंतिम फेरी गाठता आलेली नाही. मोरोक्कोचा संघ इतिहास रचतो का, याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *